‘हरित सेतू’ विरोधात निगडीकरांचा हुतात्मा चौकात काळा झेंडा आंदोलन
निगडी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘हरित सेतू’ प्रकल्पाविरोधात निगडी परिसरातील शेकडो नागरिकांनी आज हुतात्मा चौकात काळे झेंडे दाखवत तीव्र आंदोलन केले. या प्रकल्पामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
हे पण वाचा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला; जिल्ह्यात १५ केंद्रांवर ३,२२४ विद्यार्थी
हा प्रकल्प नागरिकांची पूर्वसंमती न घेता लादण्यात आल्याचा दावा करत नागरिकांनी महानगरपालिकेच्या कारभाराचा निषेध केला. प्रशासनाने तातडीने योग्य सुधारणा न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


