हिंद-दी-चादर’ निमित्त ग्रामसभांचे आयोजन करण्याचे निर्देश
रत्नागिरी l प्रतिनिधी
‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करून समागमाबाबत व्यापक प्रचार-प्रसिद्धी करावी, असे निर्देश रत्नागिरी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारीअधिकारी वैदेही रानडे .यांनी दिले.
दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत त्यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील उपस्थित होते.
२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी खारघर, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या समागमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले. गटशिक्षणाधिकाऱ्यांचा वेळोवेळी आढावा घेऊन शिक्षण विभागास दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही सांगण्यात आले.
समागमाच्या जनजागृतीसाठी श्री सतींदर सरताज यांच्या ‘हिंद-दी-चादर’ या गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनावर आधारित भक्तीगीताचे ग्रामपंचायतींमध्ये ध्वनिक्षेप -काद्वारे प्रसारण करावे. तसेच समागमाच्या प्रचारा साठी बॅनर गावाच्या प्रवेशद्वारावर व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी लावावेत.
सर्व ग्रामपंचायतींमध्ये दररोज सकाळी स्वच्छता मोहीम राबवावी. शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची पाहणी करावी. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाच ग्रामपंचायतींची निवड करून त्यांना राज्यस्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे.
२५ फेब्रुवारीपर्यंत गावागावां आरोग्य पंधरवडा राबविण्यात येणार असून सर्व आरोग्य केंद्रे व रुग्णालयांना लक्ष्यांक देण्यात येऊन जिल्हास्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या दोन डॉक्टर व दोन कर्मचाऱ्यांचा राज्यस्तरावर गौरव करण्यात येणार आहे.


