हिवाळी क्रीडा स्पर्धेत मौजे दापोली शाळेचे चमकदार यश
दापोली: वार्षिक हिवाळी क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श शाळा, मौजे दापोलीने चमकदार कामगिरी करत नाव रोशन केले. प्रभागस्तरीय स्पर्धेत शालेय विद्यार्थ्यांनी वैयक्तिक तसेच सांघिक खेळात जोरदार कामगिरी करून शाळेस जनरल चॅम्पियन मिळवून दिले.
वैयक्तिक खेळ प्रकारात मुलांनी 100 मीटर धावणे, लांबउडी, उंचउडी, थाळी व गोळाफेक या स्पर्धांमध्ये अनेक विजेते व व्दितीय क्रमांक मिळविले. मुलींमध्ये उंचउडी, लांबउडी व थाळीफेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी झाली.
केंद्रस्तरावरही मौजे दापोलीच्या विद्यार्थ्यांनी आपली ताकद दाखवली. मुलग्यांच्या सांघिक प्रकारात कबड्डीमध्ये लहान व मोठ्या गटाने विजेतेपद, खो खोमध्ये उपविजेतेपद मिळविले. मुलींच्या सांघिक खेळात कबड्डीमध्ये लहान गट विजेते आणि मोठ्या गटाने उपविजेतेपद मिळविले, तर लंगडीमध्ये लहान गटाने विजेतेपद पटकावले.
वैयक्तिक खेळांमध्ये मुलग्यांनी 50 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, लांबउडी, उंचउडी, थाळीफेक आणि गोळाफेकमध्ये अव्वल कामगिरी करत अनेक प्रथम व व्दितीय क्रमांक मिळविले. मुलींमध्ये लांबउडी व उंचउडीमध्ये श्रध्दा हेमरमने उत्कृष्ट कामगिरी करून प्रथम व व्दितीय क्रमांक पटकावले.
शाळेच्या या यशाने मौजे दापोलीचा नामसोबा जिल्हा व केंद्रस्तरावर उजळून निघाला.


