होडावडा येथे भातशेतीची पालकमंत्री नितेश राणेंकडून पाहणी; पंचनामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

0
7

वेंगुर्ले :
अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा येथे भातशेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पाण्याच्या पातळीत झालेली घट लक्षात घेता त्यांनी परिसरातील विहिरी आणि पुलांचीही पाहणी केली.
यावेळी पालकमंत्री राणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ट्रिगर-१ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या विविध सवलती शेतकऱ्यांना प्राधान्याने आणि तातडीने मिळाव्यात, तसेच पीक नुकसानीचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
ट्रिगर-१च्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, शासन बळीराजाच्या सोबत असल्याचा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
या पाहणीवेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, वेंगुर्ले तहसीलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, जि.प. शिक्षण-आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती शंकर घारे, वेंगुर्ले तालुका कृषी अधिकारी मंगेश चव्हाण यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते.
होडावडा सरपंच रसिका केळुसकर, उपसरपंच राजबा सावंत, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, उपसरपंच वैभवी परब, पाल सरपंच कावेरी गावडे, तुळस सरपंच रश्मी परब, जि.प. सदस्य सुजाता पडवळ, पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर, सुचिता वजराटकर तसेच संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थांचीही यावेळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here