१२ सप्टेंबरला अंतरवाली सराटीत मराठ्यांनी मोठ्या संख्येने यावे : मनोज जरांगे
१२ सप्टेंबरला अंतरवाली सराटीत मराठ्यांनी मोठ्या संख्येने यावे : मनोज जरांगे
मुंबई :
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी १२ सप्टेंबर रोजी सर्व मराठ्यांनी अंतरवाली सराटी येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सांगली, सोलापूर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, नगर आणि नाशिक जिल्ह्यांसह प्रत्येक गावातील मराठ्यांनी अंतरवालीत यावे, असे त्यांनी म्हटले आहे.
“प्रत्यक्ष सगळ्यांनी या. आता आंदोलकांनी आले नाही तरी चालेल; पण १२ तारखेला या. १० लोक असले तरी मुंबईकडे जाणार,” असे मनोज जरांगे यांनी म्हटल्याचे या संदेशात नमूद करण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या पुढील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील मराठा बांधवांना अंतरवाली सराटी येथे एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.