१९४ गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी करणाऱ्या रायगड पोलिसांच्या ‘ऑस्कर’ला भावपूर्ण श्रद्धांजली

0
8
१९४ गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी करणाऱ्या रायगड पोलिसांच्या 'ऑस्कर'ला भावपूर्ण श्रद्धांजली
१९४ गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी करणाऱ्या रायगड पोलिसांच्या 'ऑस्कर'ला भावपूर्ण श्रद्धांजली

१९४ गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी करणाऱ्या रायगड पोलिसांच्या ‘ऑस्कर’ला भावपूर्ण श्रद्धांजली

अलिबाग : रायगड पोलीस दलाचा विश्वासू आणि कर्तव्यनिष्ठ श्वान ‘ऑस्कर’ याचे निधन झाले असून, त्याच्या जाण्याने रायगड पोलीस दलाने आपला एक निष्ठावान सहकारी गमावला आहे.
१९४ गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी करणाऱ्या रायगड पोलिसांच्या 'ऑस्कर'ला भावपूर्ण श्रद्धांजली
१९४ गुन्ह्यांच्या तपासात मोलाची कामगिरी करणाऱ्या रायगड पोलिसांच्या ‘ऑस्कर’ला भावपूर्ण श्रद्धांजली
सात वर्षांच्या उल्लेखनीय सेवाकाळात ऑस्करने १९४ गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत अनेक गुन्ह्यांचा छडा लावला. आपल्या तीक्ष्ण घ्राणशक्ती, धैर्य आणि कर्तव्यपरायणतेच्या जोरावर त्याने अनेक तपास मोहिमा यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.
रायगड पोलीस दलाच्या कार्यात त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. गुन्हे उघडकीस आणण्यापासून ते विविध शोध मोहिमांपर्यंत ऑस्करने निष्ठेने सेवा बजावून पोलिस दलाचा मान उंचावला.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ऑस्करला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्याची निष्ठा, सेवाभाव आणि धाडसी कार्य कायम स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
कर्तव्याला आयुष्य समर्पित करणाऱ्या या मुक्या योद्ध्याच्या स्मृतीस रायगड पोलीस दलाने साश्रुनयनांनी निरोप दिला.
🐾 भावपूर्ण श्रद्धांजली, वीर योद्धा ऑस्कर!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here