१९ वर्षीय पूजाची सुवर्णझेप; महिलांच्या उंच उडीतील १४ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडला

0
85

हाँगकाँग, प्रतिनिधी : भारतीय ॲथलेटिक्समध्ये नव्या इतिहासाची नोंद करत १९ वर्षीय पूजा (Pooj)a हिने महिलांच्या उंच उडी प्रकारातील १४ वर्षे जुना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. हाँगकाँग येथे झालेल्या Asian U20 Athletics Championships स्पर्धेत तिने ही ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदकावरही नाव कोरले.
स्पर्धेदरम्यान पूजाने प्रथम १.९१ मीटरची उडी मारून स्वतःचाच U20 आशियाई ॲथलेटिक्स राष्ट्रीय  विक्रम सुधारला. या कामगिरीमुळे ती भारताच्या सर्वकालीन उंच उडीपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली.
यानंतर पुढील प्रयत्नात तिने तब्बल १.९३ मीटरची उडी घेत भारताच्या वरिष्ठ महिलांच्या उंच उडीतील राष्ट्रीय विक्रमावर आपले नाव कोरले. या कामगिरीसह उंच उडी प्रकारात कोणत्याही भारतीय महिलेने गाठलेली सर्वोच्च उंची आता पूजाच्या नावावर नोंदवली गेली आहे.
विशेष बाब म्हणजे, पूजाकडे सध्या वरिष्ठ आणि U20 आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धांमधील सुवर्णपदके आहेत. अल्पवयातच तिने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे भारतीय क्रीडाक्षेत्रात तिचे विशेष कौतुक होत आहे.
या विक्रमी कामगिरीमुळे पूजाने आगामी राष्ट्रकुल खेळांसाठी (Commonwealth Games )स्पर्धेसाठी पात्रता देखील मिळवली आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पदकाच्या आशा अधिक बळकट झाल्या आहेत.
पूजाच्या या ऐतिहासिक यशामुळे भारतीय ॲथलेटिक्सला नवी दिशा मिळाली असून देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here