५३ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी जनार्दन बंगे व प्रथमेश नाईक यांची सामनाधिकारी म्हणून निवड
५३ व्या राज्य अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणीसाठी जनार्दन बंगे व प्रथमेश नाईक यांची सामनाधिकारी म्हणून निवड
सिंधुदुर्गच्या दोन्ही सुपुत्रांना राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत सामनाधिकारी म्हणून संधी
सिंधुदुर्ग :
५३ व्या कुमार व कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्गचे सुपुत्र जनार्दन बंगे व प्रथमेश नाईक यांची सामनाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
विरार पश्चिम येथील म्हाडा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडू सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी जनार्दन बंगे व प्रथमेश नाईक यांची सामनाधिकारी म्हणून निवड झाल्याने सिंधुदुर्गच्या क्रीडा क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
राज्यस्तरावरील महत्त्वाच्या कबड्डी स्पर्धेत सामनाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाल्याबद्दल दोघांचेही क्रीडाप्रेमी आणि कबड्डी क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.