₹४,०६३ कोटींचे तीन मेनबोर्ड आयपीओ येणार
मुंबई l प्रतिनिधी
मुंबई : भारताचा प्राथमिक भांडवली बाजार येत्या आठवड्यात चांगलाच गजबजलेला राहणार असून तीन प्रमुख मेनबोर्ड आयपीओद्वारे एकत्रित सुमारे ₹४,०६३ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय अनेक एसएमई इश्यू बाजारात येणार असल्याने एकूण निधी संकलन जवळपास ₹४,३०० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
या यादीत अक्षय ऊर्जा क्षेत्रातील क्लीन मॅक्स एन्विरो इनेंर्गय सोल्युशन्स , ज्वेलरी रिटेलर पीएनजी रेवा डायमण्ड ज्वेलरी आणि इंजिनिअरिंग सोल्युशन्स प्रदाते ओंनीटेक इंजिनीरिंग यांचा समावेश आहे.आठवड्यातील सर्वात मोठा आयपीओ क्लीन मॅक्स एन्व्हायरो एनर्जी सोल्युशन्सचा असून कंपनी ₹३,१०० कोटी उभारणार आहे.
यात ₹१,२०० कोटींचा फ्रेश इश्यू आणि ₹१,९०० कोटींची ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. हा आयपीओ २३ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान खुला राहील. किंमत पट्टा ₹१,००० ते ₹१,०५३ प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. क्रिसिलच्या माहितीनुसार, मार्च २०२५ पर्यंत ही कंपनी भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक व औद्योगिक अक्षय ऊर्जा पुरवठादार असून जुलै २०२५ पर्यंत २.५४ गिगावॅट कार्यान्वित क्षमता तिच्याकडे होती. आवाहनही आयोजकांकडून करण्यात आले आहे.
पीएनजीएस रेवा डायमंड ज्वेलरीचा आयपीओ पूर्णतः ₹३८० कोटींच्या फ्रेश इश्यूद्वारे उभारण्यात येणार आहे. हा इश्यू २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान खुला राहील आणि ४ मार्चला लिस्टिंग अपेक्षित आहे. किंमत पट्टा ₹३६७ ते ₹३८६ प्रति शेअर असून सध्या ग्रे मार्केटमध्ये सुमारे ४ टक्के प्रीमियम दिसत आहे. “रेवा” या ब्रँडअंतर्गत सोने व हिरे दागिने विकणारी ही कंपनी सप्टेंबर २०२५ पर्यंत २५ देशांत ३४ दुकाने चालवत आहे.
ओम्निटेक इंजिनिअरिंगचा आयपीओ २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान खुला राहणार असून ५ मार्चला लिस्टिंग अपेक्षित आहे. कंपनी ₹४१८ कोटींच्या फ्रेश इश्यू आणि ₹१६५ कोटींच्या ऑफर फॉर सेलद्वारे एकूण ₹५८३ कोटी उभारणार आहे. किंमत पट्टा ₹२१६ ते ₹२२७ प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. कंपनी अचूक अभियांत्रिकी घटक निर्मिती तसेच टर्नकी औद्योगिक ऑटोमेशन सेवा पुरवते.
एकूणच, विविध क्षेत्रांतील या आयपीओंमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून बाजारातील तरलता आणि गुंतवणूकदारांचा उत्साह कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.


