कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याबाबत निर्णय घेतला आहे. लसीकरणासाठी कोविन अँपद्वारे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. याशिवाय, व्हॅक्सीन तयार करणाऱ्या कंपन्या आपला 50% पुरवठा केंद्राला देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. तर, इतर 50% पुरवठा राज्य सरकारांना किंवा ओपन मार्केटमध्ये देता येईल.
केंद्र सरकार आपल्या 50% कोट्यातून सर्वात प्रभावित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लस पुरवण्याचा क्रायटेरिया ठरवेल आणि त्यांना लस पुरवणार आहे. व्हॅक्सीनच्या वेस्टेजवर राज्यांची निगेटीव्ह मार्किंगदेखील केले जाणार आहे. व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सना व्हॅक्सीनेशमध्ये प्राथमिकता दिली जाईल. व्हॅक्सीनचा पहिला डोस घेतलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना प्राथमिकता दिली जाईल.