24 तासांत कामावर हजर राहा नाहीतर सेवासमाप्ती-एसटी महामंडळ

0
52
एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण; कामगार संघटनेची महामंडळाला नोटीस !

एसटी महामंडळाचे विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.राज्य सरकार आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. एसटी महामंडळाच्या वतीने 24 तासांत कामावर हजर राहा नाहीतर सेवासमाप्ती केली जाईल. अशी नोटीस कर्मचाऱ्यांना बजावण्यात आली आहे. यामध्ये चालक, वाहक, लिपीक आणि टंकलेखक यांचा समावेश आहे.

एसटी महामंडळाने दोन हजार 296 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करु नये,जर तुम्ही होणाऱ्या आत्महत्या थांबवल्या तर मी शासन दरबारी शब्द टाकू शकतो त्यामुळे तुम्ही आत्महत्येचे सत्र थांबवा असे आवाहन राज ठाकरेंनी केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here