देशातील कोरोना रुग्णसंख्येत सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्र (9,083) आणि केरळ (13,772 )मध्ये आढळून आले आहेत. या दोन्ही राज्यात सध्या सर्वात जास्त रुग्णांवर उपचार सुरु आहेत.एकूण कोरोना रुग्णसंख्येत देशात पुन्हा एकदा घट दिसून आली असून मागील 24 तासात 43,504 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.तर 44,204 बरे झाले असून या महामारीत 908 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे.
गुरुवारी, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,625 ने कमी झाली आहे. एक दिवसापूर्वीच यामध्ये 336 ने वाढ झाली होती. गेल्या 105 दिवसांत प्रथमच ऍक्टिव्ह रुग्ण वाढले होते. यापूर्वी 12 मे रोजी यामध्ये 6,399 ची वाढ झाली होती. गुरुवारी देशात आढळून आलेल्या एकूण कोरोना प्रकरणांमध्ये 53% रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ या राज्यातील आहेत.