14 हजार 650 लसी उपलब्ध
सिंधुदुर्ग– 45 वर्षावरील नागरिकांसाठीचे कोविशिल्ड लसीच्या पहिल्या व दुसऱ्या डोससाठीचे लसीकरण सत्र आज दि. 4 जून 2021 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या लसीकरण सत्रासाठी जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 14 हजार 650 कोविशिल्डच्या लसी उपलब्ध असल्याची माहिती मुख्य कार्याकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये 45 वर्षाखालील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार नाही. फ्रंट लाईन वर्करचे पहिल्या डोसचे लसीकरण करण्यात येणार नाही. फ्रंट लाईन वर्कर्सना फक्त दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात येणार आहे. दुसरा डोस देय असलेल्या लाभार्थ्यांची यादी संबंधित संस्थांना पाठविण्यात आली असून त्यांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील 45 वर्षावरील ज्या नागरीकांना कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस देय आहे त्यांनी लसीकरण सत्राच्या ठिकाणी उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
सदर लसीकरण सत्र पुढील प्रमाणे आहे. तालुका, प्राथमिक आरोग्य केद्र अंतर्गत उपकेंद्र व उपलब्ध लसी यांची माहिती अनुक्रमे दिली आहे.
वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी – सडुरे – 50, करुळ- 150, अचिर्णे – 100, कुर्ली – 100, उंबर्डे -200, तिथवली – 100, भुईबावडा – 100,
कणकवली कालुक्यातील खारेपाटण – 150, शेर्पे – 100, नडगिवे – 50, शिडवणे – 50, कासार्डे – तळेरे – 150, वाघेरी – 150, कनेडी – सांगवे – 50, नरडवे – 50, दिगवळे – 50, गांधीनगर – 50, दारिस्ते – 50, नाटळ – 100, फोंडा – 75, घोणसरी – 100, हरकुळ खु. – 75, नागवे – 50, कळसुली – 50, हळवल – 100, वागदे – 50, बोर्डवे – 50, शिवडाव – 50, वरवडे -100, बिडवाडी – 50, आशिये – 100, कासरल – 100, नांदगाव – 100, तरंदळे – 50, सावडाव – 50, हुमरठ – 50, असळदे – 50, उपजिल्हा रुग्णालय कणकवली – 200 देवगड तालुक्यातील पडेल – 80, तिर्लोट – 110, सौंदाळे – 110, मोंड – वानीवडे – 150, मुटाट – 150, फणसगाव – उंडील – 150, पोंबुर्ले – 100, नाड – 100, मिठबांव – कोटकामते – 100, नारिंग्रे – 100, हिंदाळे – 100, इलियाळे – 100, जामसंडे – 100, वरेरी – 100, शिरगाव – तोरसोळे – 100, टेंबवली – 150, कुवळे – 100, ग्रामिण रुग्णालय देवगड – 200 मालवण तालुक्यातील आचरा – आडवली – 120, वायंगणी – 120, बांदिवडे – 120, मसुरे – देऊळवाडा -100, रेवंडी – 160, कांदळगाव – 100, चौके – घुमडे – 200, कुणकवळे – 160, गोळवण – नांदोस – 160, पेंडुर – 200, हिवाळे – असरोंडी – 100, हेदुळ – 160, किर्लोस – 100, ग्रामिण रुग्णालय, पेंडुर-कट्टा – 100, ग्रामिण रुग्णालय, मालवण – 200, कुडाळ तालुक्यात – कडावल – कुपवडे – 150, सोनवडे – 80, पांग्रड – 120, कसाल – अणाव – 100, आंम्रड – 100, गावराई – 150, पणदूर – वाडी वरवडे – 200, बांबुळी बु. 150, हिर्लोक – घावणळे – 200, झाराप – 150, माणगाव – कर्याद नारुर – 100, कळेली – 100, वासोली – 50, वाडोस -100, वालावल – अंदुर्ले – 100, चेंदवण – 70, तेंडोली – 80, पाट – 100, ग्रामिण रुग्णालय, कुडाळ -200, जिल्हा सामान्य रुग्णालय, ओरोस – 180, वेंगुर्ला तालुक्यात परुळे – केळुस – 120, कोचरा – 130, कर्ली – 120, आडेली – वझराट – 130, दाभोळी – 120, खाणोळी – 120, तुळस – उभादांडा 1- 130, उभादांडा 2-120, असोली – 120, रेडी – केरवाडी -120, आरवली -120, मोचेमाड – 130, ग्रामिण रुग्णालय वेंगुर्ला – 200, उपजिल्हा रुग्णालय शिरोडा – 140, सावंतवाडी तालुक्यात मळेवाड – आरोस – 100, भटपावणी – 100, कोंडुरे – 100, सांगेली – कोलगाव – 100, कुणकेरी – 100, कारिवडे -100, निरवडे – वेत्ये – 100, तळवडे 1- 100, माजगाव – 100, आंबोली – माडखोल – 100, देवसू – 100, चौकुळ -100, बांदा – मडुरे – 100, नातर्डे – 100, इन्सुली – 100, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी – 300, दोडामार्ग तालुक्यातील भेडशी – 200, मांगेली – 150, मोरगाव – 150, माटणे – 200, तळकट – वाफोली – 150, कुडासे – 200, ग्रामिण रुग्णालय दोडामार्ग – 150 या प्रमाणे एकूण 14 हजार 650 लसी उपलब्ध असणार आहेत.