5 मे रोजी ममता बॅनर्जी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

0
59

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत अखेर तृणमूल काँग्रेसने बाजी मारली. संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरून प्रतिष्ठा पणाला लावलेल्या भाजपाचा ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँगेसने अक्षरशा धुव्वा उडवला. अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज खोटा ठरवत तृणमूलने भाजपाला दोन आकड्यांतच रोखून तिसऱ्यांदा सत्ता मिळवली. त्यानंतर आता ५ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्रीपदाची ही तिसरी वेळ असणार आहे. ममता बॅनर्जींनी सर्व आमदार, नेते व कार्यकर्त्यांना सूचना केली आहे की, कोरनाची गंभीर परिस्थिती असल्याने कोणीही विजयी रॅली काढू नका, जल्लोष करू नका असं ममता बॅनर्जींनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. मुख्यमंत्री पदाचा शपथविधी राज्यापाल व सर्व आमदारांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.सर्व आमदारांची शपथविधी ६ मे रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here