7 मेपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा

0
71

महाराष्ट्रातील विविध भागात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे .दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात निर्माण झाल्याने वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे अजूनही 7 मे पर्यंत असाच वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा इशारा दिला आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर या जिल्ह्याना या अवकाळी पावसाने झोडपले आहे. या अवकाळी झालेल्या पावसामुळे उन्हाळा मात्र सुकर झाला आहे. मध्य महाराष्ट्रासह, मराठवाड्यात गारपीटीसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here