वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर
कॅम्प-गवळीवाडा येथील संतोष भीमराव मिसाळ व त्याचे वडील भीमराव मिसाळ यांना शिवीगाळ केल्याबाबत विचारणा केल्याचा राग येऊन अनिल तुकाराम मिसाळ याने फावड्याने भीमराव मिसाळ यांचे डोकीवर व पायावर तसेच संतोष मिसाळ यांच्या यांना हाताने थापटाने लाथाबुक्याने मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली याप्रकरणी वेंगुर्ला पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार अनिल मिसाळ यांचेवर गुन्हा दाखल झाला आहे.
सोमवारी सकाळी ६.३० वाढण्याच्या सुमारास संतोष मिसाळ हे घरात पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेलेले असताना अनिल मिसाळ यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करण्याचे कारण विचारावयास गेलेले संतोषचे वडील भीमराव मिसाळ यांना अनिल मिसाळ याने हातातील फावड्याने त्यांच्या डोकीवर व पायावर मारहाण केली. तसेच त्यांना सोडविण्यास गेलेला संतोष मिसाळ याला हाताच्या थापटाने तसेच लाथाबुक्याने मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार संतोष मिसाळ याने वेंगुर्ला पोलिसात दिली त्यानुसार अनिल मिसाळ यांचेवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल योगेश सराफदार करीत आहेत.


