सिंधुदुर्ग: शिवसेनेतर्फे २७ जुलै रोजी विद्यार्थी गुणगौरव

0
25
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

वेंगुर्ला प्रतिनिधी-  सुरेश कौलगेकर

वेंगुर्ला तालुका शिवसेनेतर्फे २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता तालुक्यातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातील दहावी, बारावीतील प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांक, बारावी – कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील प्रथम तीन क्रमांक असे एकूण ११६ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती तालुकापमुख यशवंत परब यांनी दिली.

      या कार्यक्रमाला माजी आमदार शंकर कांबळीजिल्हा संफप्रमुख अरुण दुधवडकरविधानसभा संफप्रमुख शैलेश परबजिल्हाप्रमुख संजय पडतेज्येष्ठ नेते संदेश पारकरपुष्कराज कोलेजिल्हाप्रमुख अन्य तालुका पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी झालेल्या बैठकीस उपजिल्हाप्रमुख बाळा दळवीमहिला तालुका संघटिका सुकन्या नरसुलेदीपिका गिरपविनोद राणेडेलिन डिसोजावायंगणी सरपंच सुमन कामतदिलीप राणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here