वेंगुर्ला प्रतिनिधी- भाजपा वेंगुर्लाच्यावतीने दरवर्षी कारगील विजय दिनानिमित्त माजी सैनिकांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात येतो. यावर्षी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अरुण ठाकुर यांच्या हस्ते नायब सुभेदार संतोष चेंदवणकर यांचा परबवाडा येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांसह सत्कार करण्यात आला.
संतोष चेंदवणकर हे १९९४ साली सैन्यात दाखल झाले. त्यांनी राजस्थान, जम्मू काश्मीर व पंजाब याठिकाणी २५ वर्षे देशसेवा केली. तसेच २०१९ मध्ये नायब सुभेदार या पदावरुन सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण सेवाकाळ आर्मड कोअरमध्ये घालवला. सत्कारप्रसंगी प्रसन्ना देसाई, सुहास गवडंळकर, सारिका काळसेकर, पपू परब, प्रार्थना हळदणकर, प्रणव वायंगणकर, समीर चिंदरकर, सायमन फर्नांडिस, संतोष सावंत, कृतीका साटेलकर, पुंडलिक हळदणकर, रुपेश ठाकुर आदी उपस्थित होते.
फोटोओळी – भाजपातर्फे संतोष चेंदवणकर यांचा कारगील विजय दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.


