वेंगुर्ला प्रतिनिधी- सुरेश कौलगेकर
कारगिल विजय दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब वेंगुर्ला क्लबने संजिवनी हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात बॅ.खर्डेकर महाविद्यालय, होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, रोट्रॅक्ट क्लब व अन्य संस्थांचे प्रतिनिधी मिळून सुमारे ३० जणांनी रक्तदान केले. उद्घाटन इव्हेंट चेअरमन डॉ.राजेश्वर उबाळे व रोटरी क्बलचे अध्यक्ष सुनिल रेडकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी रोटरीचे पंकज शिरसाठ, डॉ.आनंद बांदेकर, डॉ.वसंतराव पाटोळे, मृणाल परब, योगेश नाईक, राजू वजराटकर, सिधुरक्तमित्रचे महेश राऊळ, डॉ.रिना उबाळे, श्री. गावडे व ओरोस रक्तपेढीचे कर्मचारी उपस्थित होते. हे शिबीर यशस्वी होण्यासाठी संजिवनी हॉस्पिटलचे कर्मचारी, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लबने मेहनत घेतली.
फोटोओळी – रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉ.राजेश्वर उबाळे व सुनिल रेडकर यांच्या हस्ते झाले.


