सिंधुदुर्ग : भंडारी ऐक्यवर्धक मंडळाच्या सभेत विविध ठराव

0
28
दैनिक सिंधुदुर्ग समाचार

वेंगुर्ला प्रतिनिधी- भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ला या मंडळाची सभा स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स येथे अध्यक्ष रमण वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत ओबीसी समाज आरक्षणाबाबत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच जिल्हा ओबीसी संघटनेने केलेल्या पाठपुराव्याची प्रशंसा करण्यात आली.

सभेत मागील इतिवृत्त वाचन करून कायम करण्यात आले. तसेच जमा खर्चाचे वाचनही झाले. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाचा क्रिकेट संघ तयार करण्यासाठी तालुका पातळीवर क्रिकेट संघ निवडण्याचे ठरविण्यात आले. वेंगुर्ला तालुका भंडारी समाजाचे दोन संघ तयार करण्यासाठी कार्यकारिणी समिती सर्वानुमते निवडण्यात आली. त्यानुसार तालुक्यातील सर्व भंडारी समाजाच्या वीस वर्षावरील क्रिकेट खेळाडूंनी समिती सदस्य दत्ताराम नार्वेकर (९४२२५७६८४५), चिंतामणी धुरी (९४२२५७६८५८) यांच्याशी संफ साधावा, असे आवाहन रमण वायंगणकर यांनी केले आहे. यावेळी उपाध्यक्ष श्याम गोडकर, चंद्रकांत गडेकर, सचिव विकास वैद्य, सुरेश बोवलेकर, जयराम वायंगणकर, दिनेश तांडेल, डॉ. आनंद बांदेकर, दत्ताराम नार्वेकर, चिंतामणी धुरी, अॅड. प्रकाश बोवलेकर, श्रीकृष्ण पेडणेकर, सारिका कळसेकर, तृप्ती साळगावकर आदी कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी उपस्थित होते.

फोटोओळी-भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळाच्या सभेत अध्यक्ष रमण वायंगणकर यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here