देशातील कोणत्याही भागातील विद्यार्थ्याला ऊच्च दर्जाचे शिक्षण देणारी पहिली व्हर्च्युअल शाळा दिल्लीत सुरु

0
34

दिल्लीचे आम आदमी सरकार आपल्या कामाने सर्वसामान्यांच्या मनात घर करत आहे.राजधानीत सर्वसामान्यांसाठी निर्माण केलेल्या सर्व सोयींनी युक्त अशा अत्याधुनिक शाळा,सामान्यांना आधार ठरलेली मोहल्ला दवाखाने,तिथे दिल्या जाणाऱ्या सुविधा,सरकारी कार्यालयातील कामाचा बदललेला उरक याबरोबरच आता पुन्हा एकदा एक समाजउपयोगी निर्णय अरविंद केजरीवाल सरकारने घेतला आहे.

दिल्लीत राबवलेल्या शैक्षणिक धोरणाचा जगभरात डंका वाजवला जातो. त्यात आता दिल्लीमध्ये देशातील पहिल्या व्हर्चुअल शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. या व्हर्चुअल शाळेत देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी अर्ज करु शकतात. या व्हर्चुअल शाळेला दिल्ली शालेय शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे. याबाबतची घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी या शाळेच्या माध्यमातून जेईई-एनईईटीसाठी विद्यार्थी तयार होतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.अनेक मुले अशी आहेत त्यांना काही कारणास्तव शाळेत जाता येत नाही. त्यांच्यासाठी ही शाळा वरदान ठरणार आहे. शाळेचे सर्व वर्ग ऑनलाइन असतील. या शाळेला ‘दिल्ली मॉडेल व्हर्चुअल स्कूल’ असे नाव देण्यात आल्याची माहिती,मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, या व्हर्चुअल शाळेमध्ये ९ वी ते १२ वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात. आजपासून शाळेच्या प्रवेशासाठी सुरुवात झाली आहे. या व्हर्चुअल शाळेत देशातील कोणत्याही राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी अर्ज करु शकतात. व्हर्चुअल शाळेला दिल्ली शालेय शिक्षण मंडळाने मान्यता दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here