रामटेक तालुक्यात गावागावांत वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे काम सुरु

0
19

रामटेक तालुक्यात गावागावांत वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे काम सुरु

रामटेक: तालुक्यात गावागावांत वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून पाणी अडवण्याचे काम सुरु झाले आले. या पार्श्वभूमीवर आजनी नाला येथे नगरधन ग्रामपंचायत मार्फत लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. रामटेक पं. स. गटविकास अधिकारी जाधव यांच्या उपस्थितीत उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

हे पण वाचा

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह महिला, ग्रामस्थांनी श्रमदान केले. वनराई बंधारा पूर्ण झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. सिंचनासाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढल्याने पिकांच्या उत्पादकतेत सुधारणा होणार असल्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला असून या उपक्रमाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी ग्रामपंचायत सरपंच माया अरुण दमाहे, उपसरपंच श्रीराम धोपटे यांच्यासह अन्य सर्व पदाधिकाऱ्यांनी बंधाऱ्याच्या बांधकामासाठी श्रमदान करीत उल्लेखनीय सहभाग नोंदवला.कार्यक्रमाला पंचायत समिती रामटेकचे गटविकास अधिकारी जाधव, सरपंच माया अरुण दमाहे, उपसरपंच श्रीराम धोपटे, ग्रामपंचायत अधिकारी कृष्णा बानाबाकोडे, नंदीवर्धन विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दीपक मोहोड सर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, बचत गटाचे सी.आर.पी., आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here