नाशिक तपोवनातील 1,800 झाडांची कत्तल; पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध

0
165

नाशिक तपोवनातील 1,800 झाडांची कत्तल; पर्यावरणवाद्यांचा तीव्र विरोध

नाशिक: नाशिक तपोवन वृक्षतोड प्रकरणाने शहरात मोठा वाद निर्माण केला आहे. कुंभमेळा 2025 निमित्त नाशिकमध्ये तपोवन परिसरातील १,२०० एकर जागेवर साधूग्राम उभारले जाणार आहे. यातील ५४ एकर जागा नाशिक महानगरपालिका ताब्यात असून, साधूग्राम निर्मितीकरिता ही जागा मोकळी करण्यासाठी प्रशासनाने १,८०० झाडांवर फुली मारून वृक्षतोडीची प्रक्रिया सुरु केली आहे.

या नाशिक तपोवनातील १,८०० झाडे कापण्याच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. या वृक्षतोडीला विरोध म्हणून तपोवन परिसरात वृक्ष आलिंगन आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

 हे पण वाचा  https://sindhudurgsamachar.in/वनराई-बंधाऱ्यातून-पाणी-अ/

पर्यावरणप्रेमींचा संताप: “हे रामा, ही झाडे तूच वाचव!”

पर्यावरणप्रेमींनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “हे रामा, ही १,८०० झाडे तुच वाचव, प्रशासनाला सुबुद्धी दे” अशी व्यथा फलकांवर लिहिली आहे. नाशिक महापालिकेने पर्यावरणाचा विचार न करता निर्णय घेतला कार्यकर्त्यांचे म्हणणे असून१,८०० प्रौढ झाडांची कत्तल हा मोठा पर्यावरणीय गुन्हा हे आणि कुंभमेळा तयारीच्या नावाखाली हिरवाईचा बळी  दिला जात आहे

सरकारची भूमिका : गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण

तपोवन वृक्षतोड वादावर राज्य सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी कुंभमेळ्यात साधूंची संख्या मोठी असल्याने त्यांची सोय करणे आवश्यक आहे. साधूग्रामसाठी जागा उपलब्ध करण्यासाठी काही झाडांची कत्तल अपरिहार्य आहे अशी प्रतिक्रिया दिली. मात्र नागरिक या स्पष्टीकरणावर समाधानी नाहीत.

“पंढरपूर २५ लाखांची वारी सांभाळतो; मग नाशिकला १,८०० झाडे का तोडावी लागताहेत?”

नाशिककरांच्या मते पंढरपूरसारख्या छोट्या शहरात २५ ते ३० लाखांची वारी गर्दी सुरळीतपणे हाताळली जातनाशिकचे आकारमान त्यापेक्षा दुप्पट असताना १,८०० झाडे तोडण्याची गरज कशी आली? झाडाखाली राहणारे साधू स्वतःच वृक्षतोडीला विरोध करतील “साधू तर जंगलात तपश्चर्या करतात, मग त्यांच्या नावाखाली झाडांची कत्तल का?” असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

“नाशिक वृक्षतोड बालेकिल्ला” हे स्लोगन लागू नये — नागरिकांची मागणी

नाशिकच्या वाढत्या वृक्षतोड प्रकरणांमुळे शहरावर “नाशिक — वृक्षतोडीचा बालेकिल्ला” असा कलंक लागू नये, अशी मागणी नागरिक करत आहेत. पर्यावरणप्रेमींचे स्पष्ट मत आहे की, कुंभमेळ्यासारख्या धार्मिक कार्यक्रमाला विरोध नाही पण साधूग्रामसाठी हिरवाई नष्ट करणे स्वीकारार्ह नाही प्रशासनाने पर्यायी उपाय शोधावेत

नाशिक महानगरपालिकेने पंढरपूर सारख्या छोट्या शहराकडून काहीतरी शिकावे अशी अपेक्षा आहे. नाशिक जिल्हा वृक्षतोडीचा बालेकिल्ला असे स्लोगन नाशिकच्या नावावर लागले नाही पाहिजे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here