Home कोकण सावंतवाडीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे झाले शानदार उद्घाटन
सावंतवाडीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे झाले शानदार उद्घाटन
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 1 बाहेरचावाडा येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच संपन्नझाले. 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह आपले 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पक्षाच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास करण्यासाठी आमच्या राष्ट्रीय काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने निवडून देत या नगराचा विकास करण्याची संधी द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी प्रांतिक सदस्य ॲड दिलीप नार्वेकर ॲड समीर वंजारी, जिल्हा सरचिटणीस व निरीक्षक बाब्या मापसेकर, तालुका अध्यक्ष अभय मालवणकर, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साक्षी वंजारी, शिल्पा कांबळे, स्नेहल मसुरकर, निशांद शेख, ॲड रितू परब, ॲड प्रज्ञा चौगुले, सुमेधा सावंत, तवकीर शेख, गणपत उर्फ बाळ नमशी, ॲड राजेंद्र नार्वेकर, सुनील पेडणेकर, अरुण भिसे, संतोष जोईल, प्रणाली नाईक, शाम वाडकर, व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.