खारेपाटण हायस्कूल येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल, सिंधुदुर्ग यांच्या मान्यतेने खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, खारेपाटण यांच्या वतीने दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी खारेपाटण हायस्कूल येथे जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेची माहिती खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य संजय सानप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी चहा व नाश्त्याची सोय करण्यात येणार असून प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ बुद्धिबळपटू श्रीकृष्ण तांडेलकर पंच म्हणून काम पाहणार आहेत.
मुख्याध्यापक संजय सानप (मो. ७५२२९४७२३६) यांनी सर्व शालेय विद्यार्थ्यांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
तसेच स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी सुयोग धामापूरकर (मालवण) यांच्याशी ९४०४३९६२१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.


