Breaking News: कोकण रेल्वेच्या स्थानकात मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न गाडीवर अचानक दगडफेक

0
182
मडगाव–नागपूर–मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वे रद्द
मडगाव–नागपूर–मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वे रद्द

कोकण रेल्वेच्या स्थानकात मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न गाडीवर अचानक दगडफेक

रायगड :- कोकण रेल्वे मार्गावरील विन्हेरे रेल्वे स्थानकात मध्यरात्री दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दरोडेखोरांनी रेल्वेचं दार उघडून आत शिरण्याचा प्रयत्नही केला , मात्र टीसीच्या प्रसंगावधानमुळे मोठा अनर्थ टळला.

मध्यरात्रीचे साधारण दोन ते अडीचची वेळ असेल. ओखा-एर्नाकुलम एक्स्प्रेस विन्हेरे रेल्वे स्थानकात पोहोचली. यादरम्यान स्लीपर क्लासचा S-1 कोचचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा अचानक दगडफेक करण्यात आली. प्रवाशांना नेमकं काय घडलं काहीच कळलं नाही. मात्र हे काहीतरी भयंकर असल्याचं टीसीच्या लक्षात आलं. टीसी महेश पेंडसे जीवाची पर्वा न करता रेल्वेच्या दाराजवळ आले. त्यांनी जोरात दार बंद केलं आणि त्यांनी प्रवाशांना अलर्ट केलं. त्यामुळे दरोडेखोरांना आत शिरता आलं नाही आणि त्यांचा प्रयत्न फसला.

रात्रीच्या वेळी बोगीचे दरवाजे आणि खिडक्या लावुन घ्याव्यात असं आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here