रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग १० ची निवडणूक स्थगित

0
108

रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग १० ची निवडणूक स्थगित

रत्नागिरी नगरपरिषद प्रभाग क्रमांक 10 ची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केली असून आता या प्रभागातील मतदान 2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्जांवरील अपिलांचे निकाल वेळेत न मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी याबाबतची अधिसूचना काढली आहे.

प्रभाग 10 मधील अपक्ष उमेदवार सचिन शिंदे आणि संपदा रसाळ-राणा यांच्या उमेदवारी अर्जांत प्रतिज्ञापत्राशी संबंधित त्रुटी आढळल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ते अवैध ठरवले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी जिल्हा न्यायालयात अपिल केले होते. मात्र, 24 नोव्हेंबरला न्यायालयाने दोन्ही अपिलं फेटाळली, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेत विलंब झाला आणि आयोगाला निवडणूक पुढे ढकलावी लागली.

प्रभाग 10 वगळता इतर सर्व प्रभागांमध्ये निवडणुका जुने वेळापत्रकानुसारच पार पडणार आहेत. मात्र, प्रभाग 10 साठी सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत असून अंतिम उमेदवारांची यादी 11 डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल.

सुधारित वेळापत्रकानुसार 20 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल आणि मतमोजणी 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. तसेच, प्रभाग 10 मध्ये 4 डिसेंबरपासून आचारसंहिता लागू होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here