श्रीलंकेत “दितवाह” चक्रीवादळात अडकलेल्या नागरिकांची माहिती आपत्ती नियंत्रण कक्षास देण्याचे आवाहन.
श्रीलंकेमध्ये “दितवाह” चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या भारतीय पर्यटक, प्रवासी यांच्यासाठी भारत सरकार मार्फत मदत कक्ष सुरु करण्यात आलेला आहे.
श्रीलंका येथे पर्यटनासाठी किंवा इतर कामासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिक गेले असतील व त्या ठिकाणी अडकले असतील तर अशा नागरिकांनी केंद्र शासनामार्फत देण्यात आलेल्या https://t.co/FnfQcBi0rm या लिंकरवर आपली माहिती भरणे आवश्यक आहे. अशा सूचना राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष मंत्रालय, मंबई यांच्याकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सिंधुदुर्ग यांना प्राप्त झालेल्या आहेत.
या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांची माहिती त्यांचे नातेवाईकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी क्रमांक 02362-228847 किंवा मोबा. 7498067835 या क्रमांकावर द्यावी. जेणेकरुन संबंधितांना योग्य ती मदत करणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे.


