शिंदेगटाचे रामचंद्र पिंगुळकर शिवसेना (UBT) मध्ये
ठाणे │ प्रतिनिधी
ठाण्यात आज महत्त्वाची राजकीय घडामोड घडली असून शिंदेगटाचे उपविभागप्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
हे पण वाचा बुलडाण्यात मतदानादरम्यान गोंधळ; पोलिसांची कारवाई
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंगुळकर आणि त्यांच्या समर्थकांचे औपचारिक स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे तसेच अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंगुळकर यांच्या प्रवेशामुळे ठाण्यातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची चिन्हे असून, शिवसेना (उBT) मध्ये नवीन जोश निर्माण झाल्याची प्रतिक्रिया पक्षातून व्यक्त होत आहे.


