शरद पवार इन्स्पायर फेलोशिप’ची निवड जाहीर; कृषी, साहित्य व शिक्षण क्षेत्रातील ८२ गुणवंतांची निवड
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे राबविण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (शिक्षण)’ या उपक्रमाचा शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीचा निकाल जाहीर करण्यात आला असून प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील अनेक गुणवंत शिक्षकांची फेलोशिपसाठी निवड झाली आहे.
हे पण वाचा महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेची विशेष गाड्यांची मोठी व्यवस्था
राज्यभरातून मोठ्या उत्साहाने अर्ज दाखल झाले होते. प्राप्त प्रस्तावांचे काटेकोर मूल्यमापन करून निवड समितीने पात्र उमेदवारांची निवड जाहीर केली. शिक्षण क्षेत्रात नवे प्रयोग, विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, नवोन्मेषी अध्यापन पद्धती आणि समाजाभिमुख कार्याचा विचार करून शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.
प्राथमिक विभागातील निवड झालेले शिक्षक डॉ. अश्विन सुधाकरराव किनारकर, कुंवलिपक गोरेबा वाघमारे, राहुल अविनाश काळे, पियुष सुभाष जाधव, बाबलू श्यामराज राव अभिजित यादव मुघास्वर, श्रीनिवास भुरास एलनसार, बायाबळू भीमराव चव्हाण, अभय सुधा भोरे, इंदिरा नरेंद्र पोकळे, युवराज दादाराव बांगले, संतोष महादेव सातपुते, अमोल किसन ढंकारे, वासंती अनिल कोडडे (खोरडकर), सुनील दयाराम बोरिकर, दिनिष प्रसाद गायकवाड, बाबा महादेव कासार,राजेश पांडुरंग खड, पूर्वी प्रमोद सतकल, फकरीर हाजी राजमुहम्मद.
माध्यमिक विभागातील निवड –योगेश माणिक सावळा, जयश्री अनिल बोरेसे,कविता सुभाष गोरे,ऐश्वर्या अमर मुघार, गौरव अशोक शेंडकर, रिमा शिवाजी पाटील, क्षितिज सतीलकर फडके, सुलक्षणा नागनाथ फसे, योगेश दिलीप ढकाणे, मंदार अरविंद डोंबे
साहित्य क्षेत्रातील नवोदित तसेच गुणवंत लेखकांना प्रोत्साहन देणाऱ्या या फेलोशिपसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर प्रस्ताव प्राप्त झाले होते. प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करून विविध साहित्य विभागांमध्ये एकूण १२ गुणवंतांची निवड करण्यात आली आहे.
कादंबरी या विभागात सचिन शेखाने, मंदार चौधरी, गणेश पाटील यांची निवड झाली आहे. ललितेतर विभागात, पंकज फणसे, विजेंद्र टेंभुर्ने, हिना शेख यांचा समावेश असून, त्यांच्या संशोधनाधारित लेखनाला निवड समितीने उच्च दाद दिली आहे. अनुवाद या विभागात प्रथमेश ढोले, अतुल मारोद यांची निवड करण्यात आली असून विविध भाषांतील साहित्य मराठी वाचकांसाठी उपलब्ध करण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. नाटक या विभागात श्रेया पाचाल, शिवम पाचमाई यांच्या नाट्यकृती आणि प्रयोगशील लेखनाचा गौरव करण्यात आला आहे. विज्ञान साहित्य विभागासाठी विजय जाधव, डॉ. ज्योती झिरसिरे यांची निवड झाली असून विज्ञान विषयांचे लोकप्रिय आणि सोप्या भाषेत लेखन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यात आला आहे.
]सर्व निवड झालेल्या फेलोंचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून फेलोशिपशी संबंधित पुढील प्रक्रियेची माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल. या सर्व शिक्षकांना फेलोशिपद्वारे त्यांच्या कार्याचा सन्मान तर मिळणारच, पण शिक्षण क्षेत्रातील नवकल्पना, संशोधन आणि कौशल्यवर्धनासाठी मौल्यवान संधी दिली जाणार आहे. निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करताना आयोजकांनी सांगितले की, या फेलोशिपमुळे राज्यातील शिक्षणव्यवस्थेला नवी दिशा मिळेल आणि विद्यार्थ्यांना अधिक सक्षम, अनुभवसमृद्ध मार्गदर्शन प्राप्त होईल.


