‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ २०२५-२६ पासून राज्यात राबविणार
पंचायत राज संस्थांची कार्यक्षमता वाढवणे तसेच विकास योजनांची जलद आणि परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास विभागामार्फत राज्यात सन २०२५-२६ पासून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राबविण्यात येणार आहे.
हे पण वाचा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा १३ डिसेंबरला; जिल्ह्यात १५ केंद्रांवर ३,२२४ विद्यार्थी
या अभियानांतर्गत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करण्यात येणार असून, त्यांच्या कामगिरीच्या आधारे तालुका, जिल्हा, महसूल विभाग तसेच राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. या योजनेचे स्वरूप पूर्णपणे स्पर्धात्मक असेल.
या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्वतयारी म्हणून जिल्हा परिषदांना आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्वनिधीतून दरवर्षी किमान १० टक्के निधी या अभियानासाठी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.


