५ डिसेंबरला शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार; शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा

0
90
५ डिसेंबरला शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार; शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा
५ डिसेंबरला शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार; शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा

५ डिसेंबरला शाळा बंद ठेवल्यास शिक्षकांचा पगार कापला जाणार; शिक्षण विभागाकडून कठोर कारवाईचा इशारा

रत्नागिरी | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाने आपल्या प्रलवित मागण्यांसाठी १ डिसेंबर रोजी राज्यव्यापी संप पुकारला होता. या संदर्भात पुण्यात झालेल्या बैठकीत सर्व शाळा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या आंदोलना दरम्यान, प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांतर मोर्चे काढण्यात येणार आहेत. आता शिक्षण विभागाच्या तंत्रीनंतर शिक्षक संघटना कोणती भूमिका घेणार हे ५ डिसेंबर रोजी कळेल.

हे पण वाचा फासकीत अडकलेला बिबट्या खारेपाटणमध्ये जेरबंद

कोण कोण आंदोलनात भाग घेणार?
या नियोजित आंदोलनाची माहिती शिक्षाण संचालनालयाला विविध वृत्तपत्रातील बातम्या, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षण संस्था कृती समितीचे निवेदन, दत्तात्रय सावंत यांचे १ डिसेंबर २०२५ रोजीचे पत्र आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संस्था महामंडळाचे १ डिसेंबर २०२५ रोजीचे निवेदन यांसारख्या संदर्भामधून मिळाली, अशी माहिती शिक्षण संभालनालयाने दिली आहे. हे आंदोलन सरकारी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी आयोजित केले होते. राज्यातील सर्व स्तरांवरील कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार होते.

शिक्षण संचालक काय म्हणाले?
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घ्यावे. आंदोलनामुळे कोणतीही शाळा बंद ठेऊ नये. जर शाळा बंद ठेवली तर त्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य, पुणे

शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश-
या पार्श्वभूमीवर, शिक्षण संचालनालयाने विभागीय महसंचालक, जिल्हा शिक्षण अधिकारी (माध्यमिक) आणि शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (मध्य व दक्षिण) यांना विशेष निर्देश दिले आहेत. ५ डिसेंबर २०२५ रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही, याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले अहित. विद्यार्थ्यांचे हित सर्वोपरी असल्याचे या पत्रात अधोरेखित केले आहे. आदेशाचे पालन न करणान्या मुख्याध्यापक, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचान्यांच्या शाळा बंद आढळल्यास, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत, यामध्ये एका दिवसाच्या वेतनाच्या कपातीचाही समावेश आहे. ही कारवाई संबंधित अधिकान्यांनी त्यांच्या स्तरावर करावी आणि हा आदेश सर्व शाळांपर्यंत पोहोचवावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here