मोटरसायकल अपघातात दोन जखमी
खेड :-
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरघर परिसरात ७ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास मोटरसायकलचा अपघात झाला. मुंबईतील भांडुप येथून गुहागरकडे जात असलेली एमएच १४ एफबी २३५० ही मोटरसायकल अचानक चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला घसरली.
या अपघातात मोटरसायकलवरील दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखर्मीना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल करण्यात आले . जखमींमध्ये विशाल रामचंद्र गुरव (वय ३०, रा. मालवण) आणि प्रवेश सदानंद बाईत (वय ३०, रा. गुहागर-रामपूर) यांचा समावेश आहे.


