रायगडावर बेकायदेशीर व्यावसायिक बांधकामांवर संताप; युवराज संभाजी महाराजांचा सरकार आणि पुरातत्व विभागावर गंभीर आरोप

0
44

रायगड | प्रतिनिधी

दुर्गराज रायगडावर रोपवे कंपनीकडून विनापरवानगी उभारण्यात येत असलेल्या भव्य हॉटेल, कॅफे व सिमेंट-काँक्रीट बांधकामांवर युवराज संभाजी महाराज यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

हे पण वाचा विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक राजवाडा आजही भग्नावस्थेत असताना त्याच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाकडून वर्षानुवर्षे परवानग्या नाकारल्या जात आहेत, मात्र खासगी कंपनीला बेकायदेशीर बांधकामांसाठी मोकळीक दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नाममात्र नोटिसा देऊनही ही बांधकामे पूर्ण करण्यात आली असून यामागे कुणाचे पाठबळ आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.

नुकताच रायगड युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झाला असताना अशी बेकायदेशीर बांधकामे कायम राहिल्यास हे नामांकनही धोक्यात येऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे. रायगडाच्या अस्मितेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here