राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाची मुंबईत महत्वाची बैठक
संघटन बांधणीसाठी नव्या पदनियुक्त्या
मुंबई | प्रतिनिधी
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माननीय आमदार श्री. शशिकांत शिंदे तसेच अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय सिराज मेहदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात अल्पसंख्यांक विभागाच्या संघटना बांधणीच्या दृष्टीने महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्ष संघटनेला अधिक बळकटी देण्यासाठी विविध पदांवर सर्वानुमते पदनियुक्त्या करण्यात आल्या.

हे पण वाचा मालदीव कॅरम विश्वचषकात प्रशांत मोरे तिसऱ्यांदा विश्वविजेता!
या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दीकी, प्रदेश सरचिटणीस श्री. रवींद्र पवार, अल्पसंख्यांक विभागाचे मुंबई अध्यक्ष रशीद खान यांच्यासह राज्यभरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या नागरिक व पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली.
याप्रसंगी नव्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला तसेच नागरिकांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकार करत पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले.
युवा नेतृत्वांना संधी देणे, पक्षाचे बळ अधिक वाढवणे आणि संघटना अधिक गतिमान करण्याच्या भूमिकेतून या सर्व नियुक्त्या करण्यात आल्या असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. तसेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवरील सर्वसामान्यांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी तळागाळातील सामान्य जनतेसाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


