कुंभार्ली घाटातील रस्त्यांची दैना

0
89
कुंभार्ली घाटातील रस्त्यांची दैना
कुंभार्ली घाटातील रस्त्यांची दैना

कुंभार्ली घाटातील रस्त्यांची दैना

तातडीने दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा

चिपळूण : चिपळूण-कराड राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून, प्रवाशांसह वाहनचालकांसाठी हा मार्ग धोकादायक ठरत आहे. घाटातील सोनपात्र परिसरातील अवघड वळण तर अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनले आहे. चढ-उताराच्या या भागात मोठ-मोठे खड्डे पडल्याने दररोज ट्रक पलटी होण्याचे अपघात घडत आहेत.

परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडून कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here