फोंडाघाटच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा जिल्हास्तरीय स्पर्धेत उज्वल यश

0
102
फोंडाघाटच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा जिल्हास्तरीय स्पर्धेत उज्वल यश
फोंडाघाटच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा जिल्हास्तरीय स्पर्धेत उज्वल यश

फोंडाघाटच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा जिल्हास्तरीय स्पर्धेत उज्वल यश

फोंडाघाट l प्रतिनिधी :
ज्ञानवर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट, तळेरे यांच्या वतीने तळेरे महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय आंतर-कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये फोंडाघाट येथील न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत मानाचा झेंडा रोवला आहे. विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत संस्थेचा गौरव वाढवला.

निबंध स्पर्धेत नम्रता हुंबे (इ. ११वी कला) हिने प्रथम क्रमांक मिळवला, तर अनिशा चौहान (१२वी विज्ञान) आणि अनुजा पाटील (११वी विज्ञान) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत शितल गुरखे (१२वी विज्ञान) हिने प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. खुशी सावंत (११वी विज्ञान) हिला द्वितीय, तर श्रद्धा लाड (१२वी विज्ञान) हिला तृतीय क्रमांकाचा मान मिळाला.

रांगोळी स्पर्धेच्या सांघिक प्रकारात दिव्या नानचे आणि वेदिका सुतार (११वी विज्ञान) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. रेणुका मुणगेकर आणि शर्वरी शेळके (१२वी कला) यांच्या जोडीने तृतीय क्रमांक मिळवला, तर चैताली कदम आणि जान्हवी पाटील (१२वी कला) यांच्या जोडीने उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून आपली सर्जनशीलता सिद्ध केली.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे प्राध्यापक एस. आर. जोईल, एस. व्ही. सावंत, डी. बी. फड, एम. के. नारिंगकर आणि ए. एल. वाळवे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या वतीने सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात आले.

फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी, संचालक मंडळ, शाळा समिती चेअरमन, मुख्याध्यापक पी. के. पारकर, पर्यवेक्षक व्हि. पी. राठोड तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here