रत्नागिरी जिल्हा न्यायालयात ‘विधी सेवा सदन’ केंद्राचे 14 डिसेंबर रोजी उद्घाटन

0
109

रत्नागिरी : जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या वैकल्पिक वाद निवारण केंद्र ‘विधी सेवा सदन’ या इमारतीचे उद्घाटन येत्या रविवार, 14 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे. या इमारतीचे लोकार्पण मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटणे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here