मा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दापोलीत बहुविकलांग मुलांना धान्य व फळांचे वाटप
दापोली (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 12 डिसेंबर रोजी दापोली येथील बहुविकलांग वसतीगृह ‘आनंद’ येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत वसतीगृहातील मुलांसाठी धान्य व फळांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी दापोली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. सचिन तोडणकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश संघटन सचिव श्री. माधव शेट्ये, महिला समितीच्या राज्य उपाध्यक्षा सौ. सुजाता तांबे, तालुका उपाध्यक्ष श्री. रौफ काजी, सचिव श्री. दिनेश महाडिक, कार्यकारिणी सदस्य श्री. मर्चंडे, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष सईदभाई कोंडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेच्या संचालिका श्रीमती बागुल मॅडम, संचालिका शीतल देवरुखकर आणि संचालक श्री. दिनेश जैन यांच्याकडे धान्य व फळे सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमाद्वारे समाजातील दुःखित, पीडित आणि दुर्लक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा संदेश देण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे धोरण म्हणजे समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी कार्य करणे हे असून, मा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या सामाजिक कार्यातून त्याच विचारांची प्रचिती मिळाली.


