एथर रिझ्टाचा विक्रम ; अवघ्या 6 महिन्यांत 2 लाख स्कूटर विक्री
एथर एनर्जीच्या फॅमिली इलेक्ट्रिक स्कूटर रिझ्टाने 2 लाख स्कूटर विक्रीचा महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मे 2025 मध्ये 1 लाख विक्री पूर्ण केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत हा टप्पा पार करण्यात आला असून, रिझ्टाची देशभरातील वाढती लोकप्रियता यातून स्पष्ट होते.
एप्रिल 2024 मध्ये लाँच झालेल्या रिझ्टामुळे एथरची पकड दक्षिण भारतापुरती न राहता मध्य व उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे. 3.7 kWh बॅटरीसह टेराकोटा रेड आणि रिझ्टा S या नव्या व्हेरिएंट्समुळे विक्रीला आणखी गती मिळाली. सध्या एथरच्या एकूण विक्रीत रिझ्टाचे योगदान 70% पेक्षा अधिक आहे.
मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये एथरचा मार्केट शेअर FY26 च्या पहिल्या तिमाहीतील 7% वरून नोव्हेंबर 2025 पर्यंत 14% झाला आहे. पंजाबमध्ये हा वाटा 8% वरून 15% आणि उत्तर प्रदेशात 4% वरून 10% पर्यंत वाढला आहे. याच कालावधीत एथरने देशभरात 5 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री पूर्ण केली असून, एक्सपीरियन्स सेंटर्सची संख्या 524 वर पोहोचली आहे.
रिझ्टा S (IDC रेंज 123 किमी) आणि रिझ्टा Z (159 किमी) या दोन मॉडेल्समध्ये उपलब्ध असून, 56 लिटर स्टोरेज, मोठी आरामदायक सीट, प्रशस्त फ्लोअरबोर्ड आणि स्किडकंट्रोल™, फॉल सेफ™, ESS, चोरी व टो अलर्टसारखी सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत. अलीकडेच रिझ्टा Z मध्ये टचस्क्रीन अपग्रेड जाहीर करण्यात आले आहे. रिझ्टा नेपाळ व श्रीलंकेतही दाखल झाली आहे.
एथर एनर्जीचे CBO रवनीत सिंह फोकेला यांनी सांगितले की, रिझ्टामुळे एथरची पोहोच आणि वितरण क्षमता विशेषतः मध्य व उत्तर भारता


