वसई रोड स्टेशनवर उन्नत डेकचे लोकार्पण.

0
109
वसई रोड स्टेशनवर उन्नत डेकचे लोकार्पण.
वसई रोड स्टेशनवर उन्नत डेकचे लोकार्पण.
वसई रोड स्टेशनवर उन्नत डेकचे लोकार्पण.

मुंबई l प्रतिनिधी

एमआरव्हीसी (मुंबई रेल विकास महामंडळ) यांनी वसई रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वर नव्याने उभारलेल्या उन्नत डेकचे लोकार्पण केले आहे. ६० मीटर लांब आणि १० मीटर रुंद असा हा डेक असून, त्याला ३ मीटर रुंद जिने जोडण्यात आले आहेत. हा डेक आता प्रवाशांच्या वापरासाठी खुला करण्यात आला आहे.

या नव्या सुविधेमुळे वसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरील गर्दी लक्षणीय प्रमाणात कमी होणार असून, प्रवाशांच्या हालचाली अधिक सुलभ व सुरक्षित होतील. विशेषतः गर्दीच्या वेळेत होणारी चेंगराचेंगरी टाळण्यास आणि प्रवासी प्रवाह सुरळीत करण्यास या उन्नत डेकचा मोठा फायदा होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here