शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, आरवली-टांक सरस्वती विद्यालयासाठी पंचक्रोशीचा निर्धार

0
113
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा
शाळा वाचवा, शिक्षण वाचवा

शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, आरवली-टांक सरस्वती विद्यालयासाठी पंचक्रोशीचा निर्धार

वेंगुर्ले
श्री सरस्वती विद्यालय आरवली-टांक ही शाळा टिकवण्यासाठी पंचक्रोशीतील पालकांची तातडीची सभा आज संपन्न झाली. यावेळी १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयांमुळे या विद्यालयातील शिक्षक संख्या कमी होऊन भविष्यात शाळा बंद होण्याची गंभीर बाब पालकांच्या लक्षात आल्याने हायस्कूलच्या परिसरात गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व हितचिंतक बंधूभगिनी मोठ्या संख्येने जमा झाले. ‘शाळा वाचवा शिक्षण वाचवा’ या सदराखाली उपस्थित पालकांची व ग्रामस्थांची एक कृती समिती यावेळी स्थापन करण्यात आली. शाळेला भविष्यात होऊ पाहणारा धोका लक्षात घेऊन संयुक्त सह्यांची मोहिम राबवून आपले म्हणणे सरकार दरबारी माननीय जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडे मांडण्यासाठी चर्चेतून निवेदन तयार केले.
यावेळी ‘शाळा वाचवा शिक्षण वाचवा’ या सदराखाली उपस्थित पालकांची व ग्रामस्थांची एक कृती समिती स्थापन करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून बबन बागकर तर सचिव म्हणून यशवंत फटनाईक यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या चर्चेतून सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी सागरतीर्थ ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ कुडव यांनी या सभेचे नेतृत्व करत आपण सर्व मिळून शाळेच्या आणि मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी एकदिलाने मार्ग काढू या, असे आवाहन केले. आरवली ग्रामपंचायतचे सरपंच समीर कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा वाचवताना प्रत्येकाने या लढ्यात झोकून द्यावे. तसेच आपल्या आजूबाजूची सर्व मुले या आपल्या शाळेकडे कशी दाखल होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती सर्वांना केली. शाळा वाचवण्याच्या कार्यात गावातील सर्व लोकांची सर्वतोपरी मदत घेऊन सगळ्यांच्या सहकार्याने शासनाचा हा निर्णय कसा बदलता येईल, यासाठी सनदशीर मार्गाने शासन दरबारी सतत पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.
शाळेचे उपाध्यक्ष श्री. नरेंद्र मोंडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, संबंधित शाळा सध्या एक शिक्षकी होणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. तर यशवंत फटनाईक यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा अत्यंत महत्त्वाची असून शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी पोलीस पाटील बाबुराव चोपडेकर, पालक संघ उपाध्यक्ष नरेंद्र मोंडकर, सागरतीर्थ ग्रामपंचायतचे सदस्य समृद्धी कुडव, मेरी फर्नांडिस, स्मिता फर्नांडिस, गायत्री गोडकर, रचना गोडकर सेजल नाईक, आत्माराम बागलकर, महेश गोडकर, मयूर आरोलकर, घनश्याम गोडकर, राजाराम बागकर, रवींद्र बागकर, त्रिवेणु चिपकर, विजय आरोलकर, सतीश फटनाईक, शंकर नाईक, बापू भानजी, कृष्णा धुरी, सिद्धी नरसुले, कार्तिकी कांबळी, माधुरी वराडकर, वेदिका गुरव, संतोष नाईक, नारायण वरगावकर, संजय भुबे आदी पालक ग्रामस्थ बंधूभगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here