करिअर संधी : अभियांत्रिकी मुख्य परीक्षेतील अनुसूचित जाती उमेदवारांसाठी बार्टीकडून आर्थिक सहाय्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२४ उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना या योजनेअंतर्गत एकरकमी ₹१०,०००/- आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. मुलाखतीच्या तयारीसाठी हा निधी उपयोगी ठरणार असून पात्र उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीकडून करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या जाहिरात क्रमांक ०५४/२०२५ अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी मुख्य परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज करण्यासाठी व आवश्यक माहितीकरिता https://forms.gle/nkVisRqmndp1qpAM9 या लिंकवर फॉर्म उपलब्ध आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी 020-26333330 / 26333339 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


