राष्ट्रीय फॉरेन्सिक सायन्सेस विद्यापीठात विविध वैज्ञानिक व तांत्रिक पदांची भरती
नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटी (NFSU), गांधीनगर (गुजरात) येथे वैज्ञानिक व तांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी थेट भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या अधिपत्याखालील व राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेने भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. ही भरती जाहिरात क्रमांक NFSU/TECHNICAL POSTS/10/2025 दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती अंतर्गत सीनियर सायंटिफिक ऑफिसर, ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर, सीनियर सायंटिफिक असिस्टंट आणि लॅबोरेटरी असिस्टंट अशी एकूण २९ पदे भरण्यात येणार आहेत. फॉरेन्सिक सायकोलॉजी, हॅपिनेस अँड वेलबीइंग, मल्टिमिडिया फॉरेन्सिक्स, डीएनए फॉरेन्सिक्स आदी विभागांमध्ये ही पदे उपलब्ध आहेत. पात्रतेनुसार पीएच.डी., पदव्युत्तर किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन Samarth पोर्टलद्वारे अर्ज करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यास १८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत १८ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.
भरतीविषयक सविस्तर माहिती, पात्रता, अनुभव व अटींसाठी उमेदवारांनी NFSU च्या अधिकृत संकेतस्थळावरील करिअर विभागास भेट द्यावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे


