मनसे महिला संघटना अध्यक्षपद काढल्याने डोंबिवलीत मंदा पाटील नाराज

0
134
मनसे महिला संघटना अध्यक्षपद काढल्याने डोंबिवलीत मंदा पाटील नाराज
मनसे महिला संघटना अध्यक्षपद काढल्याने डोंबिवलीत मंदा पाटील नाराज

मनसे महिला संघटना अध्यक्षपद काढल्याने डोंबिवलीत मंदा पाटील नाराज

मुंबई 
मनसेच्या डोंबिवली शहर महिला संघटना अध्यक्षा व पाथर्ली प्रभागाच्या माजी नगरसेविका मंदा पाटील यांचे अध्यक्षपद कोणतीही पूर्वसूचना न देता काढून घेण्यात आल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्ष स्थापनेपासून मनसेसोबत कार्यरत असून मागील १२ वर्षे महिला संघटना अध्यक्ष म्हणून महिलांचे प्रश्न, अन्याय-अत्याचाराच्या प्रकरणांत पीडितांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात मनसेचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असताना अचानक घेतलेल्या या निर्णयाचे कारण पक्ष नेतृत्वाने स्पष्ट करावे, अशी मागणी मंदा पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here