२२३–राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण

0
93

राहुरी : विधानसभा सदस्य शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या २२३–राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये या मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.

हा कार्यक्रम १ जानेवारी २०२६ या अर्हता दिनांकाच्या आधारे राबविण्यात येणार आहे. त्यानुसार, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर ३ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

मतदार याद्यांबाबत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ३ जानेवारी ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान ठेवण्यात म्हण आला आहे. प्राप्त झालेल्या दावे व हरकतींचा निपटारा ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्यात येणार असून, अंतिम मतदार यादी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

दरम्यान, पात्र नागरिकांनी या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, नावात किंवा तपशीलांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. पोटनिवडणुकीच्या दृष्टीने मतदार याद्यांचे अद्ययावतकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here