कणकवली तालुकास्तरीय शालेय कला व क्रीडा महोत्सवाचे शिवडाव येथे दिमाखात उद्घघाटन
कणकवली : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शिक्षण विभाग आयोजित कणकवली तालुकास्तरीय शालेय बाल कला, क्रीडा व ‘ज्ञानी मी होणार’ महोत्सवाचा सन २०२५-२६ या सर्धेचे नुकतेच मंगळवार दि.२३ डिसेंबर २०२५ रोजी शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या भव्य पटांगणावर कणकवली पं.स.चे गट विकास अधिकारी श्री अरुण चव्हाण यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाच्या क्रीडा पथकाने अतिशय शिस्तबद्ध आणि आगळ्यावेगळ्या पद्धतीने संचलन करत मान्यवरांचे विशेष स्वागत केले, तसेच त्यांचे औक्षण करून महोत्सवाचे दिमाखदार स्वागत करण्यात आले. कणकवली तालुका पंचायत समितीच्या वतीने गटशिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत केले.
या कार्यक्रमाला सहाय्यक गट विकास अधिकारी मंगेश वालावलकर,शिवडाव सेवा संघाचे अध्यक्ष मोहन वसंत पाताडे, सरपंच नितिश नारायण भिसे,शालेय समिती अध्यक्षा भाग्यरेखा गोविंद दळवी, उपसरपंच सायली सखाराम तेली, ग्रामपंचायत सदस्य नितीन गावकर, चंद्रकांत शिरसाट,अभिषेक नाडकर्णी ,शिरसाट मॅडम आणि मुख्याध्यापक मुकेश बाळकृष्ण पवार,सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,केंद्रप्रमुख,पंच,संघ व्यवस्थापक,खेळाडू विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी शिवडाव माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी ईशस्तवन व स्वागतपद्य सादर केले, तर सदाशिव राणे यांनी सुमधुर बासरी वादन केले.
या सोहळ्यात गुणवंतांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘स्वर वाद्य’ विभागीय स्पर्धेत चतुर्थ क्रमांक मिळवल्याबद्दल प्रियांका विजय भोगले यांचा गौरव करण्यात आला. तसेच इंग्रजी ऑलिम्पियाड स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मुख्याध्यापक मुकेश पवार यांचाही मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
उद्घाटन प्रसंगी बोलताना गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देताना, “तालुका स्तरावरील खेळाडूंनी आपली गुणवत्ता सिद्ध करून जिल्हा स्तरावर चॅम्पियनशिप मिळवा,” असे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कला आणि क्रीडा गुणांना वाव देणाऱ्या अशा उपक्रमांचे कौतुक करत महोत्सवाचे ‘अधिक जलद, अधिक उंच, अधिक बलवान आणि अधिक बुद्धिमान’ हे ब्रीदवाक्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन मैदानात संचलन करण्यात आली. सर्व मुलांना’ क्रीडा प्रतिज्ञा’ देण्यात आली.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात दिला आहे. दोन्ही दिवसांच्या भोजन खर्चासाठी प्रमोद सावंत, नारायण भिसे, कृष्णा मोर्ये, श्वेता मेस्त्री,सुविद्या वालावलकर,विशाखा काणेकर, मोहन राणे, भाग्यरेषा दळवी, विजय सावंत, केंद्रप्रमुख गोपाळ जाधव, विजय शिरसाट,उत्तम तांबे,संतोष तांबे,विनायक जाधव,प्रशांत सावंत, प्रणाली सावंत,सुनील तांबे,भरत काणेकर,कृष्णा गावकर, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद केंद्र हळवल,केंद्रप्रमुख विजय भोगले, गणेश म्हसकर आणि गणेश शिवडावकर यांनी आर्थिक योगदान दिले आहे. तसेच स्पर्धा विजेत्यांसाठी शिवाजी मडव व स्नेहा मडव यांनी आकर्षक शिल्ड व ट्रॉफी प्रायोजित केल्या आहेत.
पहिल्या दिवशी विविध मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडल्या.तर बुधवार,दी.२४ डिसेंबर २०२५ रोजी समूहगान, ‘ज्ञानी मी होणार’ सामान्य ज्ञान स्पर्धा आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी किशोर गवस यांनी केले, सूत्रसंचालन राजेश कदम व सुशांत मर्गज यांनी केले, तर आभार सुधाकर गुरव यांनी मानले.सपूर्ण नियोजनासाठी विस्तार अधिकारी कैलास राऊत, प्रेरणा मांजरेकर, रामचंद्र नारकर,उपक्रीडाप्रमुख अनंत राणे आणि शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


