इंडियन ऑइलमध्ये ३९४ अराजपत्रित पदांसाठी भरती
डिप्लोमा व बी.एस्सी. उमेदवारांना संधी
नवी दिल्ली l
भारत सरकारच्या अखत्यारीतील महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट–IV, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट–IV आणि ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट–IV या पदांसाठी एकूण ३९४ अराजपत्रित पदांची भरती जाहीर केली आहे.
ही भरती आसाम, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि ओडिशा येथील इंडियन ऑइलच्या विविध रिफायनरी व पेट्रो-केमिकल युनिट्समध्ये केली जाणार आहे.
संबंधित पदांसाठी आवश्यक डिप्लोमा किंवा बी.एस्सी. पात्रता असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन ९ जानेवारी २०२६ रोजी संपणार आहे.
भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती, पात्रता अटी व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी इंडियन ऑइलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे


