इंडियन ऑइलमध्ये ३९४ अराजपत्रित पदांसाठी भरती जाहीर
ऑनलाइन अर्जांना २० डिसेंबरपासून सुरुवात
भारत सरकारच्या अखत्यारीतील महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांनी ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-IV आणि ज्युनियर क्वालिटी कंट्रोल ॲनालिस्ट-IV या पदांसह एकूण ३९४ अराजपत्रित (नॉन-एक्झिक्युटिव्ह) पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
ही भरती आसाम, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि ओडिशा येथील इंडियन ऑइलच्या विविध रिफायनरी आणि पेट्रो-केमिकल युनिट्समध्ये करण्यात येणार आहे.
संबंधित पदांसाठी आवश्यक डिप्लोमा किंवा बी.एस्सी. पात्रता असलेल्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया २० डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन ९ जानेवारी २०२६ रोजी समाप्त होणार आहे.
भरती प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती आणि अर्जासाठी उमेदवारांनी इंडियन ऑइलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे कंपनीकडून कळवण्यात आले आहे.


