सीमा सुरक्षा दलात क्रीडा कोट्यातून ५४९ कॉन्स्टेबल पदांसाठी भरती ऑनलाइन अर्जांना सुरुवात
नवी दिल्ली l
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सीमा सुरक्षा दलाने (BSF) विविध क्रीडा प्रकारांतील ५४९ रिक्त पदांसाठी क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) भरती २०२६ ची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.
ही भरती आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या किंवा राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्ये पदके मिळवलेल्या पात्र व गुणवान खेळाडूंसाठी करण्यात येणार आहे. विविध क्रीडा प्रकारांतील उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत.
या पदांसाठी मॅट्रिक (दहावी) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून, उमेदवारांकडे उत्कृष्ट क्रीडा कामगिरीचा पुरावा असणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल (जीडी) म्हणून सेवा करण्याची संधी मिळणार आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २७ डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन १५ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार असून, इच्छुक उमेदवारांनी rectt.bsf.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन BSF कडून करण्यात आले आहे.


